Sunday, 16 December 2007

हिवाळा आणि वाचन

हा हा म्हणता लंडन मध्ये येऊन आता १० महिने होवुन गेले. आणि आता it's the beginning of the famous English summer. ह्या विषयी आधी खुप ऐकले होते. खुप बोअरींग असते आणि थंडीची सवय नसल्यामुळे शरिराची पण हालत होते. त्याची प्रचिती येवु लागली आहे. विकडेस कसे जातात हे जरी कामाच्या धबडग्यात कळत नसले तरी विकेडंस जरा बोरींगच असतात. सध्या इंटरनेट आणि वाचन हया वर भर आहे. नुकतेच अनिल बर्वे ह्यांचे "११ कोटी गँलन पाणी" हे पुस्तक वाचले. जवळ जवळ १२ वर्षांनंतर त्यांचे पुस्तक वाचले. It's typical Anil Barve type book! excellent..!!
जवळ जवळ १२ वर्षांनंतर त्यांचे पुस्तक वाचले. त्यामुळे पुर्ण झाल्याशिवाय काही खाली ठेवले गेले नाही. पुलं च देखिल एक पुस्तक आणले आहे. त्यांच्या विविध भाषणांचा संग्रह आहे. पुलंचा नाटक, चित्रपट इत्यादी कलाविषयक क्षेत्रांमध्ये त्यांचे किती विपुल ज्ञान होते ह्याची प्रचिती हे पुस्तक वाचतांना येते.
ह्या पुस्तकांविषयी पुन्हा कधितरी....

1 comment:

Tulip said...

अनिल बर्वेंच्या पुस्तकाबद्दल तुम्ही लिहिणार होतात नां? वाचायची उत्सुकता आहे. हे एकच त्यांच पुस्तक मी वाचलेलं नाही त्यामुळे.